
चिपळूण (प्रतिनिधी) : केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या आयुर्वेद चल स्वास्थ्य रक्षा कार्यक्रमांतर्गत भीमसैनिक युवा प्रतिष्ठान, चिपळूण यांच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक चिकित्सा, औषधी वितरण व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर खेंड वरची बावशेवाडी, महाबोधी बुद्ध विहार, चिपळूण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे.
शिबिरामध्ये नागरिकांची आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण केले जाणार आहे. तसेच नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भीमसैनिक युवा प्रतिष्ठान, चिपळूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आयु. आकाश कांबळे – ९१४५८ २२३५०, आयु. प्रसन्न मोहिते – ९५५२७००२२०, आयु. अजय पवार – ९१३०६ १७२६९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.



