महाराष्ट्रराजकीय

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अनिल मोहिते निवडणुकीच्या रिंगणात

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सांगली येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अनिल देवदान मोहिते हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, शिक्षणक्षेत्रातील सकारात्मक बदल आणि शिक्षकांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी शिक्षक मतदारांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा वाढता सहभाग आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष कार्य केलेल्या शिक्षकांना प्रतिनिधित्व मिळण्याची गरज, या मुद्द्यांकडे मोहिते यांनी लक्ष वेधले आहे. शिक्षकांनी मतदान करताना उमेदवाराचे शैक्षणिक योगदान, शिक्षकांप्रती असलेली बांधिलकी आणि शिक्षणक्षेत्रासाठीची भूमिका विचारात घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

भारत सरकारचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले मोहिते हे सामान्य कुटुंबातून आलेले शिक्षक असून, शिक्षणक्षेत्रातील योगदानाच्या बळावर ते निवडणुकीत उतरले आहेत. शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ आणि शिक्षणातील सकारात्मक बदल यांसाठी काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

शिक्षक मतदारांनी स्वतंत्रपणे विचार करून मतदानाचा निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मतदानाची माहिती : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असल्याचे उमेदवाराने दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. मतपत्रिकेवरील त्यांचा अनुक्रमांक ८ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button