सम्राट अशोका मेडिटेशन सेंटरतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
धम्मप्रसार, सामाजिक जागृती आणि धम्मदीक्षा मेडिटेशन सेंटर उभारण्याचा संकल्प

ऐरोली, ठाणे : सम्राट अशोका मेडिटेशन सेंटरच्या वतीने अश्विन नगर, खाडीमश, दिवा नाका परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक संघटनेचे पदाधिकारी, भीम आर्मीचे पदाधिकारी, महिला तसेच मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्थानिक संघटनेचे अध्यक्ष मा. मोहन शिंगे, उपाध्यक्ष मा. राकेश गायकवाड, सचिव मा. प्रकाश मोरे, सुभाष भाले, खजिनदार मा. साहेबराव देवरमनी, धनराज मनोरे, भीम आर्मीचे अध्यक्ष मा. अविनाश गरुड, मा. सुहास पवार यांच्यासह भीम आर्मीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वैशाली गायकवाड, सुजाता मांडले यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.
यावेळी बौद्ध धम्माच्या पद्धतीनुसार कार्यक्रम पार पडला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बौद्ध धम्माची शिकवण, धम्मप्रसार आणि सामाजिक जागृती यांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजामध्ये बौद्ध धम्माचे विचार रुजवून समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित जागृत समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
धम्मदीक्षा मेडिटेशन सेंटर उभारण्याचा संकल्प
या परिसरात धम्मदीक्षा मेडिटेशन सेंटर उभारून बौद्ध धम्माचा व्यापक प्रचार-प्रसार करणे, सामाजिक जागृती निर्माण करणे आणि समाजाला धम्माच्या विचारांशी जोडणे, असा संकल्प सम्राट अशोका मेडिटेशन सेंटर व संबंधित संघटनांनी व्यक्त केला. या उपक्रमातून धम्मविचारांचा प्रसार होऊन जागृत आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या संकल्पाच्या पूर्ततेसाठी सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद लाभावेत, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.



