कोकणरत्नागिरीसामाजिक

हर्णेत ४ ऑक्टोबरला मोफत वैद्यकीय शिबिर

अपरांत हॉस्पिटल व छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचचा संयुक्त उपक्रम

चिपळूण (प्रतिनिधी) : अपरांत हॉस्पिटल, चिपळूण आणि छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णे, दापोली येथे रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल हायस्कूल, हर्णे येथे होणाऱ्या या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिरात प्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. अब्बास जबले, फिजिशियन डॉ. रहिमत जबले, जनरल सर्जन डॉ. सदगुरू पाटणकर, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. सुरेश भास्करवार, फिजिशियन डॉ. अतुल बोरोडे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूजा भुरण हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत नेत्र तपासणीही करण्यात येणार आहे.

बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री मुजफ्फर भाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत असून मंचचे उपाध्यक्ष शिवश्री दिनेश जी. माटे, कोकण प्रदेश अध्यक्ष तुळशीराम पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नईम शेख, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी प्रमुख रिजवाना शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हर्णे पंचक्रोशीतील नागरिकांनी या मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
मेहमूद पावसकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष – ९०७६६१९१५५
अब्दुल मजीद मणियार – ७७०९४९१०८३८
अब्दुल रऊफ पावसकर – ८८३३८५५६४३८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button