कोकणरत्नागिरीशैक्षणिकसामाजिक

प्रमोद गांधींचा वाढदिवस ठरला आरोग्यदायी;

तळवलीत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी

आबलोली (संदेश कदम) : वाढदिवस केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद सिताराम गांधी यांनी घालून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

चिपळूण येथील रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण यांच्या नियोजनातून आणि एसएमएस हॉस्पिटल, चिपळूण यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून जवळपास ३०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, तर ५० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.

शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, डोळे, दात तसेच ईसीजी तपासणीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. गरजेनुसार औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. सुरेंद्र ऑप्टिकल्स, दादर, मुंबई यांच्या सहकार्याने नेत्र तपासणीची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसोबतच आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबतही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पात्र रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. हृदयविकार, मूत्रपिंड, पित्ताशय, कॅन्सर, हर्निया आदी आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि गरजू रुग्णांना पुढील उपचारांची दिशा, अशा विविध अंगांनी हे शिबिर उपयुक्त ठरले. तळवली तसेच परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल जाधव, उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर, मुंढरचे शाखाध्यक्ष सुजित गांधी, वडदचे शाखाध्यक्ष प्राणेश पिंपळकर, महाराष्ट्र सैनिक सोहम गांधी, सांस्कृतिक विभाग प्रमुख राहुल जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक विनायकराव मुळ्ये, दिलीप आग्रे, महाराष्ट्र सैनिक विराज गांधी, सागर शिरगावकर तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे प्राचार्य महावीर थरकार, प्रा. गवळी, प्रा. संदेश देवरुखकर, प्रा. अमोल जड्याळ, केळस्कर सर उपस्थित होते.

एसएमएस हॉस्पिटल, चिपळूणचे डॉ. कैलास नागरगोजे, मेडिकल ऑफिसर अजय शिंदे, लॅब टेक्निकल स्वप्निल बाईत, समर्थ अंबेडे, धर्मश्री कदम, प्रिया मांडवकर, साक्षी मोहिते, वैभव बांगर तसेच सुरेंद्र ऑप्टिकल्स, दादर, मुंबईचे ऑप्टोमेट्रिस्ट सुरेंद्र निकम, नेत्रतज्ज्ञ दर्शना जाधव, गौरव निकम, निर्मला मडीये आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रमोद गांधी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल जड्याळ यांनी केले, तर केळस्कर सर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button