कोकणरत्नागिरी

पवारसाखरीच्या सौ. पुष्पा महादेव नागे यांचे निधन

20 रोजी पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम

गुहागर (उत्तम पवार) : तालुक्यातील पवारसाखरी बुद्रुक येथील बौद्धवाडीतील रहिवासी तथा माजी सैनिक आयु. महादेव सुडक्या नागे यांच्या पत्नी सौ. पुष्पा महादेव नागे (वय ७०) यांचे १३ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

सौ. पुष्पा नागे या सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असत. कुटुंबासोबतच वाडीच्या सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा अनेकांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने नागे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पवारसाखरी बुद्रुक बौद्धवाडी परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पती, चार मुलगे, तीन सुना तसेच नातवंडे असा परिवार आहे.

सौ. पुष्पा महादेव नागे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यानुमोदन, धम्म संस्कार व शोकसभा कार्यक्रम रविवार, दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता पवारसाखरी बुद्रुक येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण कार्यक्रम पूज्य भिक्खू विमलबोधी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन बौद्धजन सहकारी संघ, शाखा पवारसाखरी बुद्रुक बौद्धवाडी क्र. २० (गाव व मुंबई), ता. गुहागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button