
तळवली ( वार्ताहर ) : निर्मल ग्रामपंचायत तळवलीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राकेश पवार यांची सलग तिसऱ्या वर्षी एकमताने निवड करण्यात आली.

मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे ग्रामसभेत कौतुक करण्यात आले. सामाजिक कार्याची आवड, गावातील नागरिकांशी असलेले सलोख्याचे संबंध तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपविण्यात आली.
नोकरी सांभाळूनही गावातील विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे राकेश पवार यांची कार्यतत्परता आणि सामाजिक बांधिलकी यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.




